अमृत सेन त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, "तुम्ही कोण आहात?"
त्यावर ते म्हणाले, "आम्ही कश्यप ऋषींचे शिष्य आहोत. आम्ही 14 वर्षे त्यांच्याकडे राहून काही खास विद्या प्राप्त केल्या आहेत. आम्ही या राज्यात प्रथमच येत आहोत."
त्यानंतर पहिला म्हणाला, " मी जमिनीवर पाय आपटून जमिनीच्या पोटात काही दडलेलं असेल तर सांगू शकतो."
त्यावर दुसरा म्हणाला, " मी जमिनीच्या पोटातील खजिना नक्की कुठे दडलेला आहे हे सांगू शकतो."
तिसरा म्हणाला, " मी एखाद्या व्यक्तीला जर केवळ एकदा पाहिलं, तर नंतर ती व्यक्ती कोणताही वेश धारण करून माझ्या समोर आली, तरी मी तिला लगेच ओळखू शकतो."
मग त्या तिघांनी अमृतसरला विचारलं, "तू कोण आहेस?"
अमृत सेन म्हणाला, "मी आहे एक सामान्य नागरिक पण माझ्याकडे सुद्धा एक गुण आहे."
"तो कुठला?" तिघे एकदमच म्हणाले.
" कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही संकटातून मी सुटका करू शकतो."
" पण ही विद्या तू शिकला तरी कुठे? तूझे गुरु तरी कोण?"
राजपुत्र म्हणाला, " मला ही विद्या जन्मजातच अवगत आहे मी ही कोणाकडूनही शिकलेलो नाही".
आता त्या तिघांच्या अंगच्या त्या खास गुणांची परीक्षा घेऊन पहायची राजपुत्र अमृत सेनला इच्छा झाली.
ते सर्वजण चालू लागले. चालता-चालता पहिला माणूस रस्त्यात थांबला आणि एका विशिष्ट जागी पाय आपटून म्हणाला, " या ठिकाणी भुयारी मार्ग आहे."
मग सर्वांनी मिळून तिथे जाण्यास सुरुवात केली. खरोखरच या ठिकाणी एक भुयार होतं. या भुयारातून चालू लागले. भुयारी रस्ता राजाच्या राजवाड्यात जात होता. थोडे अंतर चालून गेल्यावर दुसऱ्याने अचानक एका कोपऱ्यात बोट दाखवले आणि म्हणाला या ठिकाणी गुप्त खजिना आहे.
हे ऐकून राजपुत्र अमृत सेन आश्चर्याने थक्क झाला. तो त्या तिघांकडे बघुन म्हणाला, " तुम्ही इथेच थांबा. मी जरा जाऊन येतो. कदाचित आपण सर्वजण चोर आहोत, असा कोणाचा तरी गैरसमज होऊन बसेल. मी बाहेर पडून पाहून येतो आणि लगेच तुम्हाला येऊन भेटतो."
त्यानंतर तो त्या भूयारा बाहेर पडला आणि त्याने आपल्या शिपायांना बोलावून घेऊन भुयारात उभ्या असलेल्या तिघा माणसांना अटक करण्याची आज्ञा केली. त्यानंतर तो आपल्या राजवाड्याकडे निघून गेला.
दुसर्या दिवशी सकाळी त्या तिघा माणसांना दरबारात हजर करण्यात आले. त्या तिघांनी समोर पाहिले तर राजाच्या शेजारच्या सिंहासनावर कालचा तो माणूस बसलेला होता. तो खुद्द राजपुत्र आहे हे पाहून त्यांना धक्का बसला.
हे तिघे अनोळखी वाटसरु राजवाड्याच्या गुप्त खजिन्याच्या जवळपास सापडले, त्यामुळे त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी राजांनी आज्ञा केली. त्या तिघांनी चोरट्या मार्गाने राजवाड्यात शिरून खजिना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. परंतु राजा त्यांना सजा ठोठावणार इतक्यात राजपुत्र अमृतसेन त्यांनी हस्तक्षेप केला. तो म्हणाला, "महाराज, हे तिघे चोर नाहीत. उलट खास विद्या अवगत असलेली ही माणसं आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना सोडावं. त्यांच्या निरपराधी तत्त्वाची ग्वाही मी देतो."
अशाप्रकारे अत्यंत कठीण परिस्थितीतून त्या तिघांची यशस्वीरित्या सुटका करून राजपुत्र अमृत सेनेने आपल्या अंशी खासियत सिद्ध केली.
(सुधा मूर्ती, अध्यक्षा, इन्फोसिस फाउंडेशन)
No comments:
Post a Comment